BMC Election 2026 – वॉर्ड क्र. 141 मधून विठ्ठल लोकरे यांचा सलग पाचव्यांदा विजय

मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्र. 141 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांचा दणदणीत विजय मिळाला आहे. भाजपच्या उमेदवार श्रुतिका मोरे यांचा पराभव करत 8483 मतांनी विठ्ठल लोकरे यांचा विजय झाला. सलग पाचव्यांदा लोकरे हे नगरसेवक म्हणून निवडून आले.