मुंबईत दहा हजार उमेदवारी अर्जांची विक्री; 44 अर्ज दाखल

मुंबई महापालिका निवडणुकीत अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली आहे. चार दिवसांत 10 हजार 343 अर्जांची विक्री झाली आहे. पालिकेने सुरू केलेल्या निवडणूक कार्यालयांतून उमेदवारांना 30 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार असून 44 अर्ज दाखल झाले आहेत. मुंबई पालिकेने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीसाठी 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू केली आहेत. वॉर्डमध्ये कक्ष उभारून जाती आणि प्रवर्गनिहाय व्यवस्था पालिकेने तैनात ठेवली आहे. या ठिकाणी अर्ज स्वीकृतीसाठी इच्छुकांच्या रांगा लागत आहेत. आज शनिवारी या कार्यालयांतून 1 हजार 294 अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. तर 35 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. 23 डिसेंबर रोजी 4 हजार 165 अर्ज, 24 डिसेंबर रोजी 2 हजार 844 , 26 डिसेंबर रोजी 2 हजार 40 व 27 डिसेंबर रोजी 1 हजार 294 उमेदवारी अर्जांचे वितरण झाले आहे.