
मुंबईत महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. जोगेश्वरीतील वॉर्ड क्रमांक 73 मध्ये शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल धगधगली आहे. शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार लोना रावत यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर यांचा पराभव केला.































































