
शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून पालिका कर्मचाऱयांना न्याय मिळाला आहे. प्रलंबित प्रश्न सोडवले जात आहेत. त्यामुळे पालिकेचे कामगार, कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ, सुरक्षा रक्षक, तांत्रिक कर्मचारी, पंत्राटी कर्मचारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याच पाठीशी ठाम राहणार असल्याचा निर्धार म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या मेळाव्यात केला. परळ येथील शिरोडकर सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या मेळाव्यासाठी पालिकेच्या विविध भागातील शेकडो कर्मचारी उपस्थित होते. पालिका कामगार, कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि तांत्रिक कर्मचारी अशा प्रवर्गांना गटविमा योजना लागू करणे, महागाई भत्त्यासह सातव्या वेतन आयोगाची तंतोतंत अंमलबजावणी, कालबद्ध पदोन्नती, सेवा निवृत्त कर्मचाऱयांचे देय दावे, रिक्त पदे भरणे अशा प्रश्नांबाबत चर्चा सुरू असल्याचे यावेळी मेळाव्यात अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले. यावेळी कामगार सेनेचे सरचिटणीस सत्यवान जावकर, सरचिटणीस अॅड. रचना अग्रवाल, चिटणीस संजय वाघ यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी चिटणीस हेमंत कदम, अजय राऊत, वृषाली परुळेकर, हरिदास जामठे, सुभाष पवार, संदीप तांबे, महेश गुरव, अतुल केरकर, रामचंद्र लिंबारे, शिल्पा पोवार, रंजना नेवाळकर आदी उपस्थित होते.
कामगारांचे प्रश्न शिवसेनाच सोडवणार!
या कामगार मेळाव्यात आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे यांनीदेखील पालिका कर्मचाऱयांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. ही संघटना आपली असून कर्मचाऱयांचे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील, असे वचनच कामगार सेनेच्या वतीने बाबा कदम यांनी कर्मचाऱयांना दिले. या मेळाव्याला झालेल्या प्रचंग गर्दीप्रमाणे आगामी काळातही शिवसेनेला पाठिंबा देत एकजूट दाखवा असे आवाहनही त्यांनी उपस्थित कर्मचाऱयांना केले.























































