
मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापक मोहीम राबवली जात आहे. नागरिक स्वतःहून लस घेण्यासाठी येत आहेत. आतापर्यंत 42 लाख नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 82 लाख नागरिकांचा एक डोस पूर्ण झाला आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमीच आहे, अशी माहिती महानगरपालिकेने उच्च न्यायालयात दिली.
अॅड. धृती कपाडिया यांच्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. ‘अंथरुणाला खिळलेल्या व्यक्ती आणि घराबाहेर पडू शकत नसलेले वृद्ध नागरिक यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागणार नाही हे ऐकून आम्ही आनंदी आहोत.’ असे न्यायमूर्ती म्हणाले.


































































