
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत रितू तावडे यांच्या हातातल्या घडाळ्यावर फोकस करण्यात आले आहे. त्या घडाळ्याची किंमत तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे.
रितू तावडे यांच्या हातातील घड्याळ हे रोलेक्स कंपनीचे आहे. यल्लो गोल्ड रोलेक्स डेटोन लाईट डायल असे त्या घडाळ्याचे नाव असून त्याची हिंदुस्थानमधील किंमत बाजारभावानुसार 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्या घडाळ्याचा फोटो व्हायरल होत असून त्याची किंमत ऐकून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी या घडाळ्यावरून महापौरांना ट्रोल देखील केले आहे.
मोदींपेक्षाही महाग घड्याळ रितू तावडेंकडे
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटावरील घडाळ्याचा फोटो व्हायरल झाला होता. ते घड्याळ 50 हजार रुपये किंमतीचे होते. त्यावरून फकिर बाबांकडे एवढे महाग घड्याळ असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं. आता रितू तावडे यांच्याकडील घडाळ्याची किंमत ऐकून नेटकऱ्यांनी महापौरांकडे पंतप्रधानांपेक्षाही महाग घड्याळ अशी प्रतिक्रीया दिली आहे.



























































