पालिकेत 1684 लिपिकांची मेगा भरती

1111

पालिकेत लवकरच कार्यकारी सहाय्यकांची (लिपिक) तब्बल 1684 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी एक लाखांवर अर्ज येण्याचा अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे. यात 300 ते 900 रुपयांपर्यंत फी घेतली जाणार असून पालिकेला आठ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे.

पालिकेच्या कार्यकाही सहाय्यक (लिपिक)ची 5255 पदे असून रिक्त असणारी पदे सरळसेवा पद्धतीने भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार असून भरती परीक्षाही ऑनलाईनच होणार आहे. या भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज मागवणे, संगणक ज्ञान परीक्षा व बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या ‘महा-आयटी’ संस्था करणार आहे. हा निकाल पालिकेकडे दिला जाईल. त्यानंतर पालिका इंग्रजी व मराठी टंकलेखनाची ऑनलाईन व्यावसायिक चाचणी परीक्षा पालिकेच्या स्तरावर घेऊन एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आहे. याबाबत लवकरच पात्रता आणि अटी-शर्तींची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या