80 मुंबईकरांनी नाकारली खड्डय़ांची बक्षिसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

खड्डे दाखवा, बक्षीस मिळवा योजनेत रस्त्यावर खड्डा दाखवूनही 80 मुंबईकरांनी बक्षिसाची रक्कम नाकारली तर 75 तक्रारदारांनी बक्षीस स्वीकारले. पालिकेकडे एकूण 1,630 खड्डय़ांच्या तक्रारी आल्या होत्या.

मुंबईतील रस्त्यावर पडलेला खड्डा दाखवा आणि 48 तासांमध्ये खड्डा न भरल्यास 500 रुपयांचे बक्षीस मिळवा, अशी बक्षीस योजना महिनाभरापूर्वी मुंबई महापालिकेने जाहीर केली. त्यानंतर लोकांकडून खड्डय़ांबाबत तक्रारी येऊ लागल्या. मुंबईकरांनी या योजनेतंर्गत रस्त्यांवरील खड्डय़ांची छायाचित्रे महापालिकेच्या पोर्टलवर अपलोड केली. पालिकेकडे एकूण 1,630 खड्डय़ांच्या तक्रारी आल्या. त्यापैकी निश्चित केलेल्या वेळेत 1,475 तक्रारींचे निवारण करण्यात आले तर 155 तक्रारींचे निवारण करण्यात आले नाही.

रस्ते विभागाकडून 75 तक्रारदारांनी प्रत्येकी 500 रुपयांची बक्षीसाची रक्कम स्वीकारली. मात्र, उर्वरित 80 जणांनी रक्कम स्वीकारली नाही. या बक्षीस योजनेवर आतापर्यंत 37 हजार 500 रुपये खर्च झाले आहेत.