राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्याला दिलेली नोटीस पालिकेने मागे घेतली नाही, प्रशासनाचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यात बेकायदेशीरपणे केलेले बदल हटवावेत यासाठी राणे यांना दिलेली नोटीस मागे घेतली नसल्याचे पालिका प्रशासनाने आज स्पष्ट केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तीन आठवडे कारवाई करू नये, असे आदेश दिले असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

मंगळवारी उच्च न्यायालयात जिल्हा प्रशासनाने तांत्रिक कारणांमुळे राणे यांच्या बंगल्याला दिलेली नोटीस मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी पुढील कार्यवाहीसंदर्भात सर्व पर्याय खुले असल्याचेही जाहीर केले. मात्र मंगळवारी सोशल मीडियावर राणे यांना पालिकेने दिलेली नोटीस मागे घेतल्याचे पसरविण्यात आले. या पार्श्वभूमीवर पालिकेने नोटीस मागे घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे.