जम्बो कोविड सेंटरजवळील 384 झाडांची छाटणी; अतिदक्षता विभागातील  395 रुग्णांना इतरत्र हलवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण किनारपट्टीवर उद्या 15 मेपासून तीन दिवस ‘तौकते’ चक्रीवादळ येणार असल्याने पालिकेने सतर्कता म्हणून जम्बो कोविड सेंटरच्या अतिदक्षता विभागातील 395 रुग्णांना पालिका व राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सहाही जम्बो कोविड सेंटरच्या परिसरातील 384 झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी मुंबईत लसीकरणही बंद ठेवण्यात येणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार कोकण किनारपट्टीवर 15 मेपासून येणारे वादळ 16 आणि 17 मे रोजी मुंबईच्या किनाऱयावरही धडकणार आहे. त्यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पालिकेच्या यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या नेतृत्वाखाली आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, मुख्य चौपाटय़ांवर पूर बचाव पथके तैनात ठेवणे, आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन पालिकेने यावर्षीही आधीच उपाययोजना केल्या आहेत. चौपाटय़ांच्या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या मोबाईल व्हॅन्स कार्यतत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व चौपाटय़ांवर नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जोराच्या वाऱयाचा जम्बो कोविड सेंटरला धोका पोहोचू नये म्हणून भायखळा व मुलुंड परिसरातील रीचर्डसन क्रूडास, वरळी एनएससीआय वरळी डोम, बीकेसी, नेस्को, दहिसर, कांदरपाडा, शीव, मालाड, कांजुरमार्ग आदी जम्बो कोविड सेंटरलगतच्या 384 झाडांची शास्त्राsक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे.

मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये धडकणार

देशाला कोरोनाच्या चिंतेने ग्रासले असताना वरुणराजा मात्र चांगली कृपा करणार आहे. यंदा मान्सून निर्धारित वेळेआधीच म्हणजे 31 मे रोजी केरळात दाखल होईल, असे नवीन भाकीत हवामान खात्याने शुक्रवारी केले. सर्वसाधारणपणे 1 जूनला केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. यंदा एक दिवसआधीच मान्सूनची केरळात हजेरी लागणार आहे.

समुद्र किनाऱयावरील वस्त्यांना इशारा

  • समुद्र किनाऱयाजवळील पाणी शिरण्याची शक्यता असणाऱया वस्त्यांबाबत विभागस्तरीय कार्यालयांद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर विभागातील तात्पुरत्या निवाऱयाची ठिकाणे स्वच्छ करून सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व 24 विभागीय नियंत्रण कक्ष आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.
  • ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी पंप व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून सदर ठिकाणी ‘रिफ्लेक्टीव्ह जॅकेट’ परिधान केलेल्या कामगारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर साचलेला कचरा स्वच्छ करण्यात येत आहे.
  • वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय क्षेत्रातील जनित्र व इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करून घ्यावी.