दोन वर्षांनंतर माऊंट मेरी यात्रा गजबजणार, 100 सीसीटीव्ही, 24 तास कंट्रोल रूम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शंभर वर्षांची परंपरा असलेल्या वांद्रे पश्चिम येथील मोत माऊली माऊंट मेरी यात्रा उद्या 11 सप्टेंबरपासून दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर पुन्हा एकदा गजबजणार आहे. यात्रेसाठी 24 तास पंट्रोल रूम, 100 सीसीटीव्ही पॅमेरे, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि गर्दीच्या नियोजनासाठी पालिकेच्या माध्यमातून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. 18 सप्टेंबरपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे.

‘मोत माऊली’ आणि ‘वांद्रे फेस्ट’ अशा नावांनी प्रसिद्ध असणाऱया माऊंट मेरी यात्रेसाठी दररोज लाखो मुंबईकर येत असतात. मात्र कोरोनामुळे दोन वर्षे यात्रेत खंड पडला होता. मात्र या वर्षी कोरोना निर्बंध नसल्याने पूर्ण क्षमतेने मोठय़ा उत्साहात यात्रा पार पडणार आहे. यात्रेसाठी दररोज एक लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या सुविधा आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांच्या सहाय्याने वाहतुकीचे नियंत्रण, पार्पिंगसाठी परिसरातील खासगी संस्थांच्या मोकळय़ा जागा, सुट्टीच्या दिवशी शाळांची मैदाने उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशा केल्या सुविधा

या वर्षी प्रथमच यूटय़ूब, ट्विटरवर यात्रेचे थेट प्रक्षेपण

कचरा व्यवस्थापनासाठी ‘एच/पश्चिम’मधील कर्मचारी तैनात

भाविकांच्या सुविधेसाठी फिरती शौचालये

पूजा साहित्य, खेळणी विक्रीला माऊंट मेरी, केन रोडवर पिचेस
भाविक पायी जात असल्याने रस्त्यांची दुरुस्ती

सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाकडून बंब तैनात

परिसरात अनधिकृत स्टॉलधारकांना बंदी