विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी पालिकेच्या 25 शाळांमध्ये ‘अटल’ विचारशील प्रयोगशाळा

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी 25 शाळांमध्ये ‘अटल विचारशील प्रयोगशाळा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, जिज्ञासा, प्रयोगशिलता, विचार करण्याची क्षमता विकसित क्हावी, संगणक, आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास क्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या निती आयोगाद्वारे  2017 पासून पालिकेच्या निवडक माध्यमिक शाळांमध्ये अटल विचारशील प्रयोगशाळा (अटल टिकरिंग लॅब) स्थापन करण्याच्या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. पालिकेच्या ‘ए’ विभागातील पुलाबा पालिका माध्यामिक शाळेत अटल विचारशील प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. शिवाय 2018-19 मध्ये पालिकेच्या गुंदवली एमपीएस शाळा, पाली चिंबई पालिका शाळा आणि  गोवंडी स्टेशन पालिका शाळा या तीन शाळांमध्ये विचारशील प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमाचा फायदा लक्षात घेता पालिकेच्या माध्यमातून आगामी काळात मोठय़ा प्रमाणात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी 25 शाळांमध्ये विचारशील प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्टय़े

–  अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान संबंधित साधनांचा प्रत्यक्ष वापर करणे, संगणक आज्ञावलीच्या कार्यपद्धती, माहितीबाबतचे ज्ञान व अनुभव प्राप्त आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करणे हा प्रमुख उद्देश आहे. या प्रकल्पासाठी मे.स्टेमरोबो टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या पंत्राटदाराला काम देण्यात येणार आहे.

–  या उपक्रमासाठी 3 कोटी 48 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याने पालिकेच्या 25 शाळांमध्ये विचारशील प्रयोगशाळा स्थापन करून त्यातील इलेक्ट्रिक व मेकॅनिकल साहित्याचे 5 वर्षे परिरक्षण करायचे आहे. कार्यादेश प्राप्त झाल्यावर आगामी 8 महिन्यांत त्याने हे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या