
देशासह मुंबईत 1 मेपासून सुरू होणाऱया लसीकरणाच्या तिसऱया टप्प्यात 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण केले जाणार असून त्यासाठी लसीकरण केंद्रे कमी पडू नयेत यासाठी मुंबई महापालिका लसीकरणाची केंद्रे वाढवणार आहे. त्यासाठी कोल्ड स्टोरेज, पुरेसे मनुष्यबळ आणि जागा असलेल्या खासगी वैद्यकीय केंद्रांना पालिका प्राधान्य देणार आहे.
18 वर्षांवरील व्यक्तींची संख्या सुमारे 90 लाख
मुंबईत तिसऱया टप्प्यात होणाऱया लसीकरणात 18 वर्षांवरील व्यक्तींची संख्या सुमारे 90 लाख इतकी आहे. त्यामुळे लसीकरणाचे मोठे आव्हान मुंबई महापालिकेसमोर उभे राहणार आहे. सध्या 73 खासगी लसीकरण केंद्रांमार्फत लसीकरण सुरू असून त्यात टप्प्याटप्प्याने खासगी केंद्रांचा सहभाग वाढवला जाणार आहे.



























































