मूर्तिकारांना दोन हजारांचा ‘खड्डा’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवात मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी पालिका मोफत जागा, शाडूची माती आणि मंडप उभारण्यासाठी परवानगी देणार आहे. मात्र मंडपासाठी रस्त्यावर खड्डा पाडल्यास प्रतिखड्डा दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. शिवाय या ठिकाणी केवळ पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याची परवानगी असेल. या ठिकाणाहून मूर्ती विकता येणार नाहीत. http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर मूर्तिकार अर्ज करू शकणार आहेत. 20 ऑक्टोबरपर्यंत या परवानगीची कालमर्यादा राहील.