रत्नागिरीत भगवती बंदरात नौका भरकटली

787

निसर्ग वादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसला आहे. समुद्रात अजस्त्र लाटांचे तांडव सुरू असताना एक नौका भरकटली. ही नौका कारवारहून कोलंबियाला निघाली होती.वादळामुळे ती नौका समुद्रात भरकटल्याने ती नौका भगवती बंदरात आश्रयासाठी आली. नौकेवर 13 जण होते.नौका किनाऱ्यावर आणण्यासाठी तटरक्षक दल आणि पोलीसांनी मदतकार्य सुरू केले.

रत्नागिरी जिल्ह्यांच्या समुद्रकिनारी प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली आहेत तर समुद्रकिनाऱ्यावरची कच्ची बांधकामे वादळी वाऱ्यांनी नष्ट केली आहेत. काही ठिकाणी तारा पडल्या आहेत. प्रशासनाने खबरदारी घेत रात्रीपासूनच विद्युत पुरवठा बंद ठेवला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या