संभाजीनगर जिल्ह्यातील बोगस पॅरा कमोंडोला लातूरमध्ये अटक

1673

संभाजीनगर जिल्ह्यातील बोगस पॅरा कमोंडो म्हणून फिरणाऱ्या युवकाला लातूरमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. त्याने बनावट कागदपत्रे तयार केल्याचेही उघडकीस आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी शिवाजी मोतीराम गुंडरे यांनी तक्रार दाखल केली आहे. आपले सहकारी भोसले यांच्यासोबत ते गस्तीवर असताना त्यांना बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या महाराष्ट्र लॉजवर एकजण स्वतःला हिंदुस्थानी स्थलसेनेचा टेक्नीकल सोल्जर (पॅरा कमांडो) असल्याचे सांगत असल्याची माहिती मिळाली. तो स्थलसेना असे चिन्ह असलेले कपडे घालत होता, तसेच बनावट ओळखपत्र, कँटीन कार्ड दाखवून लोकांवर प्रभाव टाकत होता. ही माहिती मिळाल्यावर रात्री 12.30 वाजता लॉजवर जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता अमोल संजय गायकवाड (वय 20, रा. वाकला, ता. वैजापूर, जिल्हा संभाजीनगर) हा सापडला. तो सैन्यदलात नसल्याचे त्याने सांगितले. तसेच बनावट ओळखपत्र आणि कँटीन कार्ड तयार केल्याची कबूली दिली. त्याच्याविरुध्द गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या