
परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव भागातील 15,20 गाव, वाड्या, तांड्यातील शेतकर्यांनी राणी सावरगाव येथील कृषी केंद्रातून आधिकृत पावती घेऊन सोयाबीन बियाणे खरीदी केले होते. महामंडळ कंपनीचे महागुजरात सोयाबीन 335, महाबीज सोयाबीन 335, इगल सोयाबीन 335, सारप सोयाबीन 71, ही बियाणे कच्या बिलावर 2 हजार 600 पक्या बिलावर 2200 विक्री करण्यात आले. त्यानंतर या भागात पेरणीजोगा पाऊस झाल्याने शेकडो शेतकर्यांनी वरील बियाणे आपल्या शेतीवर 12 जून ते 18 जूनच्या दरम्यान पेरणी केली. परंतु या भागात वरील कंपन्यांचे बियाणे उगवले नसल्या बाबत शेतकरी कृषी केंद्रावर आल्यानंतर कृषी केंद्र चालकांनी यात आमची काही चुक नाही असे सांगून शेतकर्यांना वार्यावर सोडले.
शेतकर्यांनी कृषी अधिकारी गंगाखेड यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली 20, 21 जून तालुका जिल्हा कृषी अधिकारी प्रत्येक्ष शेतकर्यांच्या शेतीवर हजर राहून बियाणे उगवलेले नाही याची खात्री केली. आता कृषि अधिकार्यांचा अहवाला आल्यानंतर बोगस कंपन्यांवर कारवाही होईल. परंतु शेतकर्यांचा बियाणे-खत व इतर खर्च वाया गेला आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांपुढे मोठे आव्हान आहे. शेतकर्यांना न्याय मिळून देण्यासाठी माजी सरपंच तथा सदन शेतकरी ज्ञानेशवर जाधव हे कंपन्या व विक्रेत्यांवर कडक कारवाही व्हावी, अन्यथा शेतकर्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.





























































