
सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई
अंबाजोगाई – लोखंडी सावरगाव रोडवर भरधाव बोलेरो गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री झाला. बालाजी दत्तात्रय रिटरकर (वय २५) असे मयत तरूणाचे नाव आहे.
बालाजी रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच ४४ पी ८२६३) अंबाजोगाईहून वरपगावकडे जात होता. तो लोखंडी सावरगाव रस्त्यावर आडस पाटीच्या जवळ आला असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो गाडीने (एमएच १४ बीएक्स ९२४७) त्याला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी बोलेरोच्या खाली गेली . या अपघातात बालाजीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक सोमनाथ गिते यांनी घटनास्थळी भेट दिली.दरम्यान, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
summary…bollero-heat-motorcycle-1-killed






























































