बॉलिवूड अभिनेत्रींच्या गाजलेल्या साड्यांमधील हॉट लूक

1561

साडी हा तमाम हिंदुस्थानी स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय. अगदी दररोज फॅशनेबल कपडे घालणाऱ्या अभिनेत्रीही स्वतःचं साडीप्रेम आवर्जून दाखवतात. काळाच्या ओघात अनेक फॅशन ट्रेंड रुजवणाऱ्या बॉलिवूडलाही या साडीची भुरळ पडली नसेल तर नवल. म्हणूनच अनेक अभिनेत्रींनी चित्रपटात नेसलेल्या साड्या फॅशन ट्रेंड झाल्या. महिला प्रेक्षकांनीही या हिट झालेल्या साड्यांना आपल्या वॉर्डरोबमध्ये स्थान दिलं. पाहुयात बॉलिवूडचे हे सुपरहिट साडी ट्रेंड्स-

रेट्रो स्टाईल साडी, चित्रपट ब्रम्हचारीmumtaj

साधारण 70च्या दशकात साडीत निरनिराळे प्रयोग होऊ लागले होते. ब्रम्हचारी चित्रपटात अभिनेत्री मुमताज यांनी नेसलेली एका विशिष्ट प्रकारची साडी त्याकाळी महिलांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली होती. चापून चोपून नेसवलेली, काहीशी तंग साडी, त्यावर छोट्या बाह्यांचे किंवा स्लीव्हलेस ब्लाऊज आणि तोकडा पदर असा फॅशन ट्रेंडच रुजला होता.

बॅकलेस ब्लाऊजच ग्लॅमर, चित्रपट- हम आपके है कोनmadhuri-dixit

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा हम आपके हैं कौन हा चित्रपट माहीत नाही, असा चाहता विरळाच असेल. या चित्रपटातल्या दीदी तेरा देवर दिवाना या गाण्यात माधुरीने नेसलेली जांभळ्या रंगाची साडी त्या काळात प्रचंड गाजली. याचं कारण होतं, त्यावरचा तिचा बॅकलेस ब्लाऊज. सॅटिन सिल्कची प्लेन साडी, पदर आणि ब्लाऊजला असलेलं नक्षीकाम आणि मटका स्टाईलने शिवलेला बॅकलेस ब्लाऊज अशी ही फॅशन तमाम तरुणींमध्ये हिट झाली. गंमत म्हणजे ही फॅशन आजही बघायला मिळते, विशेषतः लग्नसमारंभात.

नेटच्या तलम स्पर्शाची साडी, चित्रपट – चांदनीshreedevi

1989साली आलेला श्रीदेवी अभिनित चांदनी हा चित्रपट यशराजच्या हिट चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाची कथा-दिग्दर्शन जितकं हिट होतं, तितकीच त्याची फॅशनही झाली. बिना मिशीचा अनिल कपूर तर लोकांना आवडलाच पण, श्रीदेवी यांनी नेसलेली पिवळ्या रंगाची नेटची जाळीदार तलम साडीही लोकांना भलतीच आवडली. हाही ट्रेंड गेला काही काळ चांगलाच रुजलाय.

फ्रील स्लीव्हज ब्लाऊज, चित्रपट- मोहराraveena-tondon

अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचा मोहरा हा चित्रपट एक हिट चित्रपट होता. यातल्या टिप टिप बरसा पानी या रोमँटिक गाण्यात रवीनाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावरचा तिचा फ्रील स्लीव्हजचा ब्लाऊज हाही तेव्हाचा एक फॅशन ट्रेंड ठरला होता. गंमत म्हणजे ही फॅशन सध्या नव्याने बाजारात आलेली पाहायला मिळत आहे.

न्यूड साडी विथ बोल्ड ब्लाऊज, चित्रपट – दोस्तानाpriyanka-chopra

प्रियांका चोप्राचं दोस्तानामधलं देसी गर्ल हे गाणं आठवतं. त्यात ती चकाकत्या न्यूड कलरची एक साडी नेसली होती. विशेष म्हणजे त्यावरचा तिचा हॉल्टर नेकचा ब्लाऊज साधारण बिकिनीवरचा असतो, तसा होता. गंमत म्हणजे तिच्या या बोल्ड लूकला प्रेक्षकांनी नाकं मुरडली नाहीत, उलट ते तिच्यावर फिदा झाले.

नेटसाडी आणि वेल्वेट ब्लाऊज, ऐश्वर्या राय-बच्चनचा थाटaishwarya-rai

2010मध्ये ऐश्वर्याने नेसलेल्या साडीने एक नवीन ट्रेंड रुजवला होता. 2010मध्ये लंडन येथे तिच्या रावण या चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी ऐश्वर्याने सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेली एक नेट-जॉर्जेट साडी नेसली होती. हेवी वर्क असलेला काठ आणि त्यावर वेल्वेटचा ब्लाऊज अशी फॅशन तेव्हा लग्नसमारंभात चांगलीच हिट झाली होती.

चेक्समेट साडी, चित्रपट – चेन्नई एक्सप्रेसdeepika-padukone

चेन्नई एक्सप्रेसमधल्या लुंगी डान्समध्ये नेसलेली मल्टीकलर चेक्स साडीही चांगलीच हिट झाली. हिरवा, निळा, काळा, पांढरा, गुलाबी अशा रंगातली ती चौकटींची साडी सामान्य महिला प्रेक्षकांनीही फॉलो करायला सुरुवात केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या