बॉलिवूड अभिनेता फराज खान याचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता फराज खान य़ाचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. फराज खान बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. ते 46 वर्षांचे होते. बंगळुरूतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री पूजा भट्ट हिने ट्विटरवरून तिच्या मित्राला श्रद्दांजली वाहिली आहे.

मेहेंदी, फरेब अशा चित्रपटांमध्ये मुख्य भुमिका केलेला अभिनेता फराज खान याची प्रकृती काही दिवसांपूर्वी खूपच बिघडली होती. त्याच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. फराजवरील उपचारांसाठी तब्बल 25 लाखांचा खर्च येणार होता. त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. फराजची कोस्टार राहिलेली अभिनेत्री पूजा भट्ट हिने देखील सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना फराजला मदत करण्याचे आवाहन केले होते. फराजला ब्रेन इन्फेक्शन व न्यूमोनिया झालेला.