‘मिसाइल मॅन’वर बनणार बायोपिक; ‘हा’ अभिनेता साकारणार अब्दुल कलामांची भूमिका

1090

बॉलिवूडमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. अशातच ‘हिंदुस्थानचे मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा बायोपिक बनणार असल्याची बातमी समोर येत आहे. कलामांच्या बायोपिकमध्ये अभिनेता परेश रावल हे अब्दुल कलम यांची भूमिका साकारणार आहे. याबाबत परेश रावल यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. कलमांचा एक फोटो शेअर करत ते म्हणाले आहे की, ‘माझ्या मते ते संत कलाम होते. मी भाग्यवान आहे की कलाम साहेबांच्या बायोपिकमध्ये मी त्यांची भूमिका साकारणार आहे.’

यापूर्वी परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मोदींची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. नंतर पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये विवेक ओबेरॉय याने मोदींची भूमिका साकारली.

आपली प्रतिक्रिया द्या