
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तब्बल 6 तास चौकशी केली आहे. अर्जुन सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाला होता. याप्रकरणी एनसीबीने दिल्ली येथील एका डॉक्टरचीही चौकशी केली आहे, ज्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे अर्जुन याला अटक ही होऊ शकते, असे बोलले जात आहे.
21 डिसेंबरला अर्जुन पुन्हा एकदा चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. त्याशी ड्रग्स संबंधित प्रश्न विचारण्यात आले. याप्रकरणी एनसीबीने दिल्ली येथील डॉक्टरचा जवाब 164 अंतर्गत न्यायाधीशांसमोर नोंदवण्यात आला आहे.
‘आज तक’शी बोलताना या डॉक्टारांनी सांगितले की, हे प्रकरण अद्याप न्यायालयात आहे. म्हणून याच्याशी संबंधित माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. जी काही महत्वाची माहिती आहे, ती मी न्यायाधीशांसमोर सांगितली आहे. मी या प्रकरणात एनसीबीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं या डॉक्टरने सांगितलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुंबईमधील एका डॉक्टरचीही चौकशी केली आहे.
‘आज तक’च्या वृत्तानुसार, अर्जुन रामपालच्या जवळच्या मित्राने दिल्लीतील एका डॉक्टरची दिशाभूल करत त्यांच्याकडून मागील तारखेचे एक प्रिस्क्रिप्शन लिहून घेतले होते. जेणेकरून एनसीबीचीच्या चॅकशीपासून वाचता येईल.
































































