‘हनीमून इन शिलाॅंग’ राजा रघुवंशी हत्त्याकांडावर बनणार सिनेमा

मध्य प्रदेशमधील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्याकांडमुळे संपूर्ण देश हादरला होता. या हत्येच्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येऊ लागली होती. रोज होणारे नवे खुलासे या प्रकरणाला नवा ट्वीस्ट आणत होते. त्यामुळे लोकांना आता ही कहाणी ऐकल्यावर एखाद्या मर्डरमिस्ट्री चित्रपटासारखी वाटतेय. फक्त लोकांनाच नाही तर आता दिग्दर्शकांनाही त्यांच्या चित्रपटासाठी एक सस्पेंन्स स्ट्रोरी मिळाली आहे.

इंदूरचे प्रसिद्ध हत्त्याकांड सोनम रघुवंशीवर चित्रपट येणार असून, त्याचे नाव ‘हनीमून इन शिलाॅंग’ असे असणार आहे.  यासाठी राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाने मुंबईतील एका चित्रपट दिग्दर्शकाला परवानगी दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रीकरण बहुतेक इंदूरमध्येच केले जाणार आहे. दिग्दर्शक एसपी निंबायत यांनी यापूर्वी ‘कबड्डी’ आणि ‘लौट आओ पापा’ हे चित्रपट बनवले आहेत.

राजा रघुवंशी यांच्या भावाने माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. मुंबईतील दिग्दर्शक एसपी निंबायत यांनी आमच्याशी चित्रपट बनवण्याबाबत चर्चा केली होती. आम्ही त्यावर सहमती दर्शवली आहे. या चित्रपटात राजाची बालपणापासून ते त्याच्या हनिमून आणि खूनापर्यंतची संपूर्ण कथा असेल, असे राजाच्या भावाने सांगितले आहे. त्यामुळे आता हा चित्रपटा नेमका कसा असेल आणि तो कधी रिलीज याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

हनिमूनला गेलेले गायब जोडपे अखेर सापडले! पत्नीने दिलेली सुपारी, शिलाँगमध्ये आढळला पतीचा मृतदेह

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट चित्रपट बनवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आमिर खान यासंदर्भात सखोल अभ्यास करत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता दिग्दर्शक एसपी निंबायत हे या मर्डर स्टोरीवर चित्रपट बनवणार असल्याचे उघड झाले आहे.

देशाला हादरवणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडाचे रहस्य उलगडणार मोठ्या पडद्यावर