
भीमा कोरेगाव व एल्गार परिषदप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांनी डिफॉल्ट जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत एनआयए आणि राज्य सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. सुधा भारद्वाज यांना 2018 साली अटक करण्यात आली असून त्या भायखळा येथील महिला कारागृहात शिक्षा भोगत आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी फेब्रुवारी 2019 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एनआयए) तपास हस्तांतरित करण्यात आला. एनआयएने या प्रकरणातील आरोपपत्र 90 दिवसांत दाखल करणे आवश्यक असतानाही अद्याप दाखल न केल्याने सीआरपीसी कायद्यांतर्गत आपण डिफॉल्ट जामीन मिळण्यासाठी पात्र आहोत असा दावा भारद्वाज यांनी केला आहे.




























































