बोरगाव खूनप्रकरणी 60 जणांवर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे उपसरपंच निवडीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एक ठार, तर चारजण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना काल (दि. 4) घडली होती. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, आतापर्यंत सातजणांना ताब्यात घेतले आहे.

ग्रामपंचायत कार्यालयानजीक बेकायदेशीर जमाव जमवून लोखंडी रॉड, काठय़ा व हॉकीस्टीकने मारहाण झाली होती. या मारहाणीत पांडुरंग जनार्दन काळे (वय 55, रा. बोरगाव) यांचा मृत्यू झाला होता, तर गणपती नामदेव पाटील, अण्णा वसंत माने, वसंत विष्णू पाटील, श्रीकांत भाऊसाहेब पाटील (सर्व रा. बोरगाव) हे चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी जनार्दन पाटील, नितीन पाटील, नामदेव पाटील, सुजित पाटील, अनिल शिंदे, संतोष पाटील, रोहित शिंदे, राहुल शिंदे, प्रदीप शिंदे, प्रवीण पाटील, अमोल पाटील, युवराज पाटील, प्रकाश पाटील, अप्पासाहेब पाटील, सचिन पाटील, अभिनव पाटील, विकास पाटील, नंदकुमार पाटील, प्रतीक पाटील, तुकाराम पाटील, किसन शिंदे, लक्ष्मण शिंदे, अविनाश यमगर, ज्योतिराम पवार, महेश पाटील, अमित पाटील, रमेश जाधव, जितेंद्र पाटील, विनायक पाटील, स्मिता पाटील, अलका पाटील, पोपट पाटील, रोहिणी पाटील, दशरथ पाटील, अलका पाटील व प्रशांत पाटील (सर्व रा. बोरगाव) व योगेश पवार, अविनाश पवार, संभाजी पवार अशा एकूण 39 जणांवर व 20 ते 25 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले तपास करीत आहेत.