पगार कमी म्हणून जॉन्सन सोडणार इंग्लंडचे पंतप्रधानपद

पगार कमी आणि घरखर्च जास्त याचा अनुभव नेहमीच मध्यमवर्गीयांना येतो, म्हणून कोणी  नोकरी सोडत नाही. पण पगार कमी असल्यामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन चक्क हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. 1 लाख 50 हजार 402 पौंड इतके वर्षासाठी पगार जॉन्सन यांना मिळतो. मात्र, त्यांचा घरखर्च भागत नाही.

‘डेली मिरर’ या टॅब्लॉइड दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे. ब्रेक्झीटचा प्रश्न मार्गी लागला की सहा महिन्यात जॉन्सन पंतप्रधानपद सोडतील असे एका खासदाराच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्ती आर्थिक संकटात सापडते आणि सर्वोच्चपद सोडते याचीच चर्चा इंग्लंडमध्ये सुरू आहे.

घटस्फोटित पत्नीला पोटगी; सहा मुलांचा खर्च

बोरिस जॉन्सन हे पंतप्रधानपदांवर येण्यापूर्वी स्तंभलेखक होते. त्यांना स्तंभलेखक म्हणून मिळणारे उत्पन्न पंतप्रधानाला मिळणाऱया वेतनापेक्षा जास्त आहे.

पंतप्रधान जॉन्सन यांना 150402 पौंड (सुमारे 1.43 कोटी रूपये) पगार वर्षाकाठी मिळतो. या वेतनात जॉन्सन यांचा घरखर्च भागत नाही. जॉन्सन यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. सहा मुले आहेत. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे. तसेच घटस्फोटित पत्नी मरीन व्हीलर यांना महिन्याला पोटगी द्यावी लागते. पंतप्रधानपद मोठे पण उत्पन्न कमी असे जॉन्सन यांचे झाले आहे. त्यामुळे जॉन्सन पंतप्रधानपद सोडून पुन्हा स्तंभलेखनाकडे वळणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या