बोरीवलीत इंद्रपस्थ शॉपिंग सेंटरमध्ये आग

1406

मुंबई उपनगरातील बोरीवली येथे असणाऱ्या इंद्रप्रस्थ या प्रसिद्ध शॉपिंग सेंटरला आग लागल्याचं वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

या इमारतीच्या तळमजल्यावर ही आग लागली असून इथे कपड्यांची दुकाने आहेत. तासाभरात ही आग वरच्या मजल्यावरही पोहोचल्याचं वृत्त आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या