Borivali बोरिवलीत रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग

girl

रिक्षाने घरी जात असलेल्या विद्यार्थिनीसोबत रिक्षाचालकाने अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना बोरिवली येथे घडली आहे. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

पीडित मुलगी ही बोरिवली परिसरात राहते. ती बोरिवली परिसरातील एका शाळेत शिकते. शनिवारी पीडित मुलगी ही नेहमी प्रमाणे शाळेत गेली. शाळा सुटल्यावर ती रिक्षाने घरी जात होती. चालकाने रिक्षा बोरिवली येथील एका पालिका गार्डन येथे थांबवली. रिक्षा बंद झाल्याचा त्याने बहाणा केला. त्याने रिक्षा गार्डन परिसरात उभी केली. त्यानंतर त्याने मुलीला गणपत पाटील नगर येथील एका ठिकाणी नेले.

तेथे नेल्यावर त्याने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले. घरी आल्यावर मुलीने याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मुलीच्या आईने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंद केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस त्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.