INDvsAUS ‘बॉक्सिंग डे’ कसोटी म्हणजे काय? वाचा काय आहे इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये उद्यापासून (शनिवार) दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला कसोटी सामना जिंकल्याने दुसरा कसोटी सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा असणार आहे. 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या कसोटीला ‘बॉक्सिंग डे’ कसोटी म्हणतात. या मागेही मोठा इतिहास आणि परंपरा आहे.

ख्रिसमसचा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळला जातो. या दिवसाला ‘बॉक्सिंग डे’ असे म्हणतात. अनेकांना हे क्रिकेटशी संबंधीत असावे असे वाटते परंतु तसे नाही. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक मिठाईचे बॉक्स एकमेकांना देतात, तसेच काही चर्चकडूनही असे बॉक्स वाटले जातात. काही ठिकाणी गरिबांना मदत म्हणून पैसे जमा करण्यासाठी बॉक्स ठेवले जातात. म्हणून या दिवसाला ‘बॉक्सिंग डे’ असे म्हटले जाते.

‘बॉक्सिंग डे’ची सुरुवात

ऑस्ट्रेलियात ‘बॉक्सिंग डे’ कसोटी खेळण्यामागे मोठा इतिहास असून याची सुरुवात 1950 ला झाली. तेव्हापासून प्रत्येक वर्षी बॉस्किंग डेला कसोटी सामना खेळला जातो. यात काही वेळा खंडही पडला. परंतु 1980 पासून ‘बॉक्सिंग डे’ कसोटी दरवर्षी मेलबोर्नमध्ये खेळवली जाऊ लागली. फक्त 1989 साली कसोटीऐवजी वन-डे सामना खेळवण्यात आला.

https://www.saamana.com/india-vs-australia-2nd-test-match-india-team/

‘बॉक्सिंग डे’ आणि हिंदुस्थान

हिंदुस्थानने आतापर्यंत 14 ‘बॉक्सिंग डे’ कसोटी खेळले आहेत. यात हिंदुस्थानला एकच विजय मिळाला आहे. परंतु, तो देखील ऑस्ट्रेलियात नाही तर दक्षिण आफ्रिकेमध्ये. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामने खेळले आहेत. यातील पाच सामने गमावले. तर, दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत आणि एक सामना जिंकला आहे.

मेलबर्नवरचा ‘सामना’

सन 1980 नंतर मेलबर्नवर झालेल्या एकूण 39 बॉक्सिंग डे कसोटी सामन्यांपैकी 8 सामन्यात हिंदुस्थानचा संघ खेळला आहे. हिंदुस्थानने सन 1985, 1991, 1999, 2003, 2007, 2011, 2014 आणि 2018 या 8 वर्षी बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला आहे. त्यातील सन 1985 आणि 2014 ला झालेला सामना अनिर्णित राहिला आहे. तर 2018 चा बॉक्सिंग डे कसोटी सामना हिंदुस्थानने जिंकला. त्याचबरोबर सन 1991, 1999, 2003, 2007 आणि 2011 ला झालेल्या सामन्यात हिंदुस्थानला पराभूत व्हावे लागले आहे.