
मोबाईलवर सतत गेम खेळतो म्हणून मुलावर रागावणे गोवंडीतील एका आईला भलतेच भारी पडल्याचे समोर आले आहे. गेम खेळतो म्हणून रागवत आईने मोबाईल हिसकावून घेतल्याने रागावलेल्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा मोहम्मद अली इमरान खान (12) हा राहत्या घरात मोबाईलतवर गेम खेळत होता. तेव्हा मोबाईल गेम खेळत बसतो म्हणून त्याची आई रागावली आणि तिने त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेत रागावली. मोबाईल हिसकावून घेतल्यामुळे रागावलेल्या मोहम्मदने घराच्या तिसऱ्यामजल्यावरील बेडरुममध्ये जाऊन ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्याला तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डाँक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात म्रत्यूची नोंद करण्यात आली आहे.या



























































