हेडफोनने घेतला जीव; रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

मोबाईलचा हेडफोन कानाला लावणे पंढरपूरच्या अठरा वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. रेल्वेचा रुळ ओलांडताना गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू न आल्याने उमेश प्रभाकर खिलारे (१८) याचा इंजिनाची धडक लागून मृत्यू झाला आहे.

पंढरपूर रेल्वे स्थानकावरची ही दुर्घटना आहे. उमेश कानाला हेडफोन लावून स्टेशनच्या प्लेटफॉर्म क्रमांक १ वरुन रुळ ओलांडत प्लेटफोर्म २ वर चालला होता. याच दरम्यान कुर्डुवाडीवरुन मिरजकडे फक्त इंजिन निघाले होते. पंढरपूर स्टेशनच्या जवळ येताच इंजिनने मोठ्याने हॉर्न वाजवला मात्र उमेश कानात हेडफोन असल्याने त्याला हॉर्नचा आवाज ऐकू आला नाही. यावेळी इंजिनची जोरात धडक बसल्याने उमेश फेकला गेला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.उमेशच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

आपली प्रतिक्रिया द्या