गरम शीरखुर्म्यात पडून बालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गरम शीरखुर्म्यात पडल्याने दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना मिरजेतील ईदगाहनगर येथील झोपडपट्टीत घडली आहे. रमजानच्या दिवशीच ही घटना घडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अरहान मोहसीन मणेर असे मृत बालकाचे नाव आहे.

मोहसीन मणेर यांच्या घरात ईदनिमित्त मोठय़ा पातेल्यात शीरखुर्मा बनवून पलंगाखाली ठेवला होता. पलंगावर झोपलेला अरहान उठल्यानंतर पलंगावरून खाली उतरताना गरम शीरखुर्म्याच्या पातेल्यात पडून होरपळला. भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या अरहानला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.