
एका तरुणाला आगीसोबत स्टंट करण चांगलच महागात पडले आहे. रिल्सच्या नादात असं काही केलं की पाठीला आग लावली आणि मग बोंबलत बसला. सध्या या तरुणाचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्याचा व्हिडीओ पाहुन सगळेच अवाक झाले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण रिल्स बनवण्यासाठी आगीसोबत खतरनाक स्टंट करतो. मात्र त्याचा हा स्टंट फसतो आणि त्याच्या पाठीला आग लागली आणि तो ओरडायला लागला. तर काही लोकं हेही सांगत आहेत की, हा व्हिडीओ पाहून इतरांनी यातून शिकायला हवे की रिलच्या नादात जीव धोक्यात घालायला नको.
व्हिडीओमध्ये बघायला मिळतं की, एक तरुणाने कॅमेऱ्याकडे पाठ केलीय आणि लायटर लावून काहीतरी स्टंट करण्याचा प्रयत्न करतोय. या स्टंटच्या नादात त्याच्या पाठीला आग लागत. कदाचित या तरुणाला वाटले असावे की आग शर्टापर्यंतच राहील. मात्र आगीने भडका घेतला आणि शर्टातून आग बनीयनला लागली आणि पाठीला चटका बसल्यावर तो ओरडायला लागला.
— Vicious Videos (@ViciousVideos) March 15, 2022
आग लागल्यानंतर तो जोर जोरात ओरडायला लागला आणि शर्ट काढून बाथरुमच्या दिशेने धावतो. या व्हिडीओला ट्विटरवर @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला. 18 सेकंदाचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून त्याला बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत. तर काही लोक व्हिडीओ पाहून लोटपोट हसत असून आगीसोबत खेळू नये अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

























































