लग्न सोहळ्यातून लहान मुलाने चोरले तब्बल 25 तोळे सोनं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gold

नगर-संभाजीनगर रस्त्यावरील एनआर लॉन्स येथील एका लग्न सोहळ्यातून शनिवारी रात्री तब्बल पंचवीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. एका लहान मुलाने सोन्याच्या दागिन्यांची बॅगच उचलून नेल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत माहिती अशी की, नगर-संभाजीनगर रस्त्यावरील एनआर लॉन्स येथील एका लग्न सोहळ्यातून शनिवारी रात्री तब्बल पंचवीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या लग्नसोहळ्याच्या पाळतीवर असलेल्या टोळीच्या इशार्‍यावरून एका लहान मुलाने 25 तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग उचलून नेली. लग्न सोहळ्यातील वऱ्हाडी मंडळींची नजर चुकवून ही बॅग चोरून नेली.