Satara News – चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला छतावरुन खाली फेकले; साताऱ्यातील घटनेने खळबळ


चारित्र्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीला छतावरुन खाली फेकल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरुषी असे मयत तरुणीचे तर ध्रुव चिक्कर असे आरोपीचे नाव आहे. दोघेही मेडिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होते. आरुषी मूळची बिहारची असून ध्रुव हरयाणाचा आहे.

आरुषी आणि ध्रुव दोघेही सातारा जिल्ह्यातील कराड येथे वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होते. महाविद्यालयाजवळच एका इमारतीत ध्रुव भाड्याच्या घरात राहत होता.

ध्रुवला आरुषीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरु असल्याचा संशय होता. याच संशयातून बुधवारी ध्रुवने आरुषीला आपल्या रुमवर बोलावले. यानंतर त्याने आरुषीला याबाबत स्पष्ट विचारले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले.

दोघांमध्ये मारामारीही झाली. यात दोघेही जखमी झाले. यानंतर ध्रुवने आरुषीला इमारतीतून खाली फेकले. यात आरूषीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरुषीच्या आईच्या तक्रारीवरुन ध्रुवविरोधात कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ध्रुववर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.