प्रेयसीशी भांडण; प्रियकराने मारली खाडीत उडी, देवदूताने वाचवले

किरकोळ कारणावरून प्रेयसीबरोबर भांडण झाल्यानंतर प्रियकराने वाशी खाडीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार समजल्यानंतर वाशी खाडीतील देवदूत म्हणून ओळख असलेले महेश सुतार हे पोलीस पथकाला घेऊन पाण्यात उतरले आणि या प्रियकराचा जीव वाचविला.

मानखुर्द येथील महाराष्ट्रनगरमधील गणेश चाळीत राहणारा रवी रेड्डी (21) याचे किरकोळ कारणावरून आपल्या प्रेयसीबरोबर भांडण झाले. या रागातून रेड्डी याने थेट वाशी खाडीपूल गाठला आणि पाण्यात उडी मारली.

ही माहिती वाशी पोलीस आणि स्थानिक मच्छीमार महेश सुतार यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने बोट काढून या तरुणाचा शोध सुरू केला. महेश यांचा सहकारी अभिषेक जैस्वाल, पोलीस हवालदार खोत, कदम, दराडे शोधाशोध केल्यानंतर रेड्डी त्यांना सापडला. त्याला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या