पाश्चिमात्य, पूर्वेकडील नागरिकांपेक्षा हिंदुस्थानींचा मेंदू लहान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाश्चिमात्य आणि पूर्वेकडील लोकांपेक्षा हिंदुस्थानातील नागरिकांचा मेंदू आकाराने लहान असल्याचे एका संशोधनातून उघड झाले आहे. हिंदुस्थानी लोकांच्या मेंदूचे उंची, रुंदी आणि घनता परदेशी पाहुण्यांपेक्षा काहीशी कमी असल्याचा दावा हैदराबाद येथील माहिती आणि तंत्रज्ञान (आयआयटीएच) विभागाने केला आहे.

देशातील लोकांच्या मेंदूचा पहिल्यांदाच अशा प्रकारचा ऍटलास तयार करण्यात आला असल्याचा दावा ‘आयआयटीएच’ने केला आहे. अल्झायमर आणि इतर मेंदूच्या आजाराचे निदान करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या संशोधनानंतर मेंदूशी संबंधित आजारांचे निदान करणे सोपे जाणार आहे. संशोधनाविषयीची माहिती नुकतीच ‘रिसर्च न्यूरॉलॉजी इंडिया’ नावाच्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. ‘मेंदूशी संबंधित आजार बारकाईने शोधण्याच्या दृष्टीने मॉण्ट्रियल न्यूरोलॉजीकल इन्स्टिटय़ूट (एमएनआय) टेम्प्लेटचा उपयोग मानकाच्या रूपात केला जातो’, असे सेंटर फॉर व्हिज्युअल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जयंत सिवास्वामी यांनी म्हटले आहे. मात्र हिंदुस्थानींच्या मेंदूचा आकार एमएनआयच्या तुलनेत छोटा असल्याने हे टेम्प्लेट देशातील लोकांच्या मेंदूशी संबंधित आजारांच्या तपासणीसाठी आदर्श पद्धत नाही, असे संशोधकांना वाटते.

  • हिंदुस्थानी लोकांच्या मेंदूचा आकार परदेशी लोकांच्या मेंदूच्या आकारापेक्षा लहान आहे, असे विविध स्कॅनद्वारे स्पष्ट झाले आहे.
  • एमएनआयद्वारे हिंदुस्थानी मेंदूची तपासणी करण्याचे धाडस चुकीचे निदान करण्यात होऊ शकते, असे एमआयआर छायाचित्राची प्रीलोडेड एमएनआय छायाचित्र टेम्प्लेटशी तुलना केल्यानंतर हे सिद्ध झाले आहे.
  • मेंदूच्या विविध आकारांपैकी कोणता आकार सामान्य मानून त्यावर संशोधन केले जायला हवे हे या व्यापक ऍटलासवरून ठरवता येऊ शकणार आहे.