
>>डॉ. अनिल कुलकर्णी
प्रवेश, अध्यापन, परीक्षा या गोष्टी पूर्वी बिनबोभाट व्हायच्या. प्रवेश प्रािढयाच मुळात किचकट झाल्यामुळे व लांबणीवर पडल्यामुळे पुढचे सर्व वेळापत्रक लांबणीवर पडते. केंद्रीय पद्धतीने प्रवेश झाल्यामुळे महाविद्यालयेसुद्धा हतबल असतात. कारण जागा पूर्ण न भरल्यास त्यांना त्या भरण्यासाठी विशेष वेळ द्यावा लागतो आणि संपूर्ण प्रवेश व्हायला वेळ लागतो. त्यामुळे पुढे अभ्यापाम सुरू व्हायला आणि परीक्षा घेण्यासाठी ठरलेल्या तारखेपर्यंत सर्व तयारी करण्यासाठी विलंब होतो.
नुकतेच माननीय राज्यपाल रमेश बैस यांनी निकाल वेळेवर लावणे ही विद्यापीठाची जबाबदारी असून यासाठी कुलगुरू जबाबदार राहतील असे जाहीर केले आहे.
आजचा विद्यार्थी हा केवळ शिक्षणक्षेत्रात ज्ञान घेण्यासाठी शिकत नसून एकाच वेळेस तो अनेक अभ्यापामांना प्रवेश घेतो व आपलं करीअर घडवतो. त्यामुळे एक परीक्षा कोलमडली की, त्याचं सगळं भविष्य व करीअर कोलमडतं. म्हणून परीक्षा या वेळेवर व्हायला हव्यात. विद्यार्थ्यांना फक्त प्रमाणपत्र हवं असतं व तेही वेळेवर.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा सराव कमी झाला आल्याचे परीक्षा आयोजन करताना विचार व्हायला हवा. प्रवेश झाल्यानंतरही प्राध्यापकांच्या अनेक जागा रिक्त असल्यामुळे तसेच पार्टटाइम शिक्षकांच्या नियुक्त्या वेळेवर न झाल्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनात व्यत्यय येतो. विद्यार्थ्यांच्या हजेरीचे 75 टक्क्यांचे बंधन असते, पण काही महाविद्यालयात विद्यार्थी गैरहजरच असतात.
तो वेगवेगळय़ा विद्या शाखांतही प्रवेश घेऊन परीक्षा देऊ शकतो. शास्त्राचा विद्यार्थी संगीत विषयही शिकू शकतो. आंतरशाखीय विषयामध्ये एका विषयाची परीक्षा लांबली व वेगवेगळय़ा विषयांचं वेळापत्रक जुळलं नाही तर शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीतीही असते. पेपर फुटल्यामुळे पुन्हा परीक्षा घेतली जाते. ‘लॉ’च्या सेमिस्टरचे पेपर गहाळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाची परीक्षा पुन्हा द्यावी लागली होती. या सर्व प्रशासनाच्या ढिलाईमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. हे उत्तरदायित्व कोणाचे?
प्रवेशाचं गणित चुकलं की, पुढचं सगळं वेळापत्रक कोलमडतं. जून महिन्यात उघडणारी महाविद्यालये आता 15 ऑगस्टला झेंडावंदनानंतरच उघडतात.
अभ्यापाम पूर्ण न होणे, कर्मचाऱयांचे संप, विद्यार्थ्यांची आंदोलने यामुळे तसंच सेमिस्टर पद्धतीने काही ठिकाणी वेळापत्रक पूर्ण करणे कसरतीचे काम होऊन जातं. पेपरफुटी, सामूहिक कॉपी याबरोबरच प्रश्नपत्रिकांमधील चुका, अभ्यापामाबाहेरचे प्रश्न विचारणं, परीक्षेचा पॅटर्न बदलणं या सर्व प्रािढयेमध्ये विद्यार्थ्यांची दखल कोणी घेतच नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो.मुंबई विद्यापीठाने विधी अभ्यापामाच्या परीक्षांना लागू केलेल्या 60:40 आकृतिबंधाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर प्रशासनाने या परीक्षा पुढे ढकलल्या. विद्यापीठाच्या या गोंधळाचा फटका विधी शाखेच्या परीक्षांना बसला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने ऑगस्टमध्ये विधी शाखेच्या प्रश्नपत्रिकेचा शंभर गुणांचा आकृतिबंध बदलून 60 गुणांची लेखी परीक्षा व 40 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असा आकृतिबंध लागू केला. त्या निर्णयाविरोधात ‘लॉ’च्या स्टुडंट्स कौन्सिलने आंदोलन केले. न्यायालयाने विधी शाखेत विविध समस्या असताना 60:40 आकृतिबंध राबवण्याची घाई कशाला? अशी विचारणा करत स्थगिती आणली. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे विद्यापीठाने बीए, बीकॉम, बीएससी अशा बिगरव्यावसायिक अभ्यापामांचे प्रथम वर्षाचे शैक्षणिक वर्ष येत्या 15 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राज्यात बारावीच्या परीक्षांबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे पदवीच्या प्रथम वर्षाचे प्रवेश कधी होणार, हा प्रश्न कायम आहे.
इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ, आर्किटेक्चर एमसीए, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, बी. टेक्नॉलॉजी अशा व्यावसायिक अभ्यापामांच्या प्रथम प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. या सीईटी परीक्षांच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात प्रवेश होतात. मात्र यंदा सीईटी सेलकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवेश प्रािढया कधी पूर्ण होतील याबाबत अनिश्चितता आहे. एमपीएससीच्या अभ्यापामातही सातत्याने बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांना तो अन्याय वाटल्यामुळे त्यांनी त्यास विरोध केला व निर्णय बदलायला लावले.
परीक्षा आम्हाला काय देते? ज्ञान नाहीतर माहिती तपासते व वरच्या वर्गात जाण्याची संधी देते. मूल्यमापनाचा शिक्का वर्षानुवर्षे तोच आहे. मूल्यमापन करणारी यंत्रणा काळानुसार सक्षम नाही. अभ्यापाम सातत्याने बदलत असतो, पाठय़पुस्तके बदलतात, बदलत नाही ते मूल्यमापन.
शिक्षण हे मानवाने संपादन केलेले एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणता येतात. हे बदल अपेक्षित दिशेने आणि किती झाले आहेत ते मूल्य निर्धारणामुळे कळते. मूल्यमापन किंवा मूल्यनिर्धारण हे साधन आहे आणि ते सुधारणेशी निगडित आहे.
सतत होणाऱया परीक्षा व त्यांची संख्या, त्यांचा निकाल लावणे ही व्यवस्थापनाच्या दृष्टीने समस्या बनली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात शिक्षण, अध्यापन, संवाद, कौशल्य प्रािढया याला एक प्रकारचा सेटबॅक मिळाला होता. शारीरिक हालचालीही सीमित झाल्या, अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. त्या मूळ पदावर आणून पुन्हा विसरलेली कौशल्ये विद्यार्थ्यांना आत्मसात करून एका नवीन मूल्यमापनाच्या प्रािढयेला सामोरे जावे लागणार आहे.
शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी परीक्षा घेऊन त्यांचे निर्णय लावणं गरजेचं आहे. पूर्वीपेक्षा अधिक परीक्षा घेण्याची प्रथा वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे परीक्षा समस्या बनली आहे. सत्र परीक्षा काही विद्यापीठांत यशस्वी झाली नाही किंवा वारंवार परीक्षेमुळे काही ठिकाणी ती योग्य हाताळता आली नाही.
अलीकडे प्रश्नपत्रिका वा तिच्यातील प्रश्न सदोष असतात, पाठय़पुस्तकेही सदोष असतात. प्रश्नासाठी निवडलेल्या पाठपामातील आशय अपुरा, मर्यादित असतो. याचाच अभ्यास करून विद्यार्थी उत्तीर्ण होतो. मूल्यमापन लेखी परीक्षेपुरतेच मर्यादित असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यमापन आजच्या आपल्या परीक्षा पद्धतीत होत नाही. परिणामी परीक्षा विश्वसनीय राहिलेल्या नाहीत. विद्यार्थ्याच्या उणिवांची चिकित्सा करून त्या दूर करण्याचे प्रयत्न वाढीला लावणे ही गोष्ट परीक्षा पद्धतीतून होऊ शकत नाही.
विद्यापीठ अनुदान आयोगाने 1973 मध्ये पदवी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी कृती योजना प्रसिद्ध केली होती. त्यात विद्यार्थ्याला अभ्यासाच्या योग्य सवयी घडविण्यास उत्तेजन मिळण्यासाठी अंतर्गत मूल्यनिर्धारण होते. या पद्धतीमुळे अन्य कौशल्य व उद्दिष्टे यांची तपासणी करता येते. सांख्यिकी विश्लेषणातून असे आढळून आले की, जेव्हा परीक्षक उत्तरपत्रिका तपासतो तेव्हा गुणदान करताना पाच टक्क्यांपेक्षा अधिक गुण देण्याची शक्यता 50 टक्के एवढी असते. विद्यार्थ्याला त्याची परीक्षा कशी घेतली जाणार आहे हे कळले पाहिजे.
चांगली शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या ज्ञानात्मक, भावनात्मक व ािढयात्मक बाजूवर सारखीच भर देत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक मूल्यमापनाची संकल्पना स्वीकारणे गरजेचे आहे. या शिक्षण पद्धतीच्या त्रुटी आहेत. परीक्षा म्हणजे केवळ ‘घोका व ओका’ यापुढे जाऊन पहा व लिहा या अवस्थेत आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा यंत्रणेला गुंडाळून ठेवले आहे. कॉपी नियंत्रणासाठी काही ठोस निर्णय दरवर्षी जाहीर होतात, पण ते पुरेसे नाहीत.
परीक्षा आयोजन करीत असताना केवळ वेळापत्रकाच्या तांत्रिक बाबीची पूर्तता करून चालणार नाही, तर परीक्षा आयोजनामधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.



























































