
चार दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दौऱ्यादरम्यान ‘ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस’ या सर्वोच्च नागरी पुरस्कार देणाऱ्या ब्राझीलने आता हिंदुस्थानच्या स्वदेशी संरक्षण क्षेत्राला मोठा झटका दिला आहे. ब्राझीलने हिंदुस्थानच्या ‘आकाश’ या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या चर्चा थांबवल्या आहेत. काही महत्त्वाच्या ऑपरेशनल पॅरामीटर्समध्ये ‘आकाश’ क्षेपणास्त्राची कमकुवत कामगिरी हे चर्चा थांबवण्यामागील प्रमुख कारण ब्राझील सरकारने दिले आहे.
हिंदुस्थानसोबत चर्चा थांबवल्यानंतर ब्राझीलने युरोपातील संरक्षण क्षेत्रातील दिग्गज एमबीडीएकडे मोर्चा वळवला आहे. दरम्यान, आत्मनिर्भर भारत ही हिंदुस्थान सरकारची मोहीम आहे. या मोहिमेलाच ब्राझील सरकारने मोठे आव्हान दिले आहे.