
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारी निवासस्थानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱया एकाला पोलिसांनी अटक केली. नूर आलम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या वाहनांची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एक बंदूक, चाकू आणि गांजा सापडला आहे. ही घटना घडली त्या वेळी ममता बॅनर्जी घरी नव्हत्या. आरोपीच्या वाहनावर ‘पोलीस’ असे स्टिकर लावलेले होते. या आरोपीकडे बीएसएफ आणि अन्य एजन्सीची अनेक ओळखपत्रे सापडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याचे वाहनही जप्त केले आहे.























































