26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक

45

दहशतवाद पोसण्यासाठी पैसा पुरवण्याच्या आरोपाखाली मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा म्होरक्या हाफीज सईद याला पाकिस्तानी दहशतवादविरोधी पथकाने आज अटक केली. अशा प्रकारे कारवाई करून पाकिस्तानने नवे नाटक सुरू केले आहे. दहशतवादविरोधी न्यायालयासमोर त्याला उभे केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी लाहोरमधील ‘हायप्रोफाईल’ लखपत तुरुंगात करण्यात आली आहे. मात्र, या आधी हाफीजला अटक केल्यानंतर तुरुंगात त्याला पंचतारांकित सुविधा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याची ही अटकही तोंडदेखले नाटक असल्याचे म्हटले जात आहे.

पंजाब प्रांतात 3 जुलैला पोलिसांनी ‘जमात उद दवा’ संघटनेच्या  13 जणांसह सईदवर दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. मात्र, सोमवारी दहशतवादविरोधी न्यायालयात त्याला अटकपूर्व जामीन मिळाला. त्यामुळे पाकिस्तानची ही कृती केवळ हिंदुस्थानच्या डोळय़ात धूळफेक करण्यासाठी होती, असा आरोप हिंदुस्थानने केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या