Breaking – शिवाजी पार्क येथे सापडला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

1770

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 537वर पोहोचलेला असताना मुंबईच्या शिवाजी पार्क येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचं वृत्त आहे. शिवाजी पार्कमधील दिनकर अपार्टमेंट या इमारतीत राहणाऱ्या या रुग्णाचं वय 60 वर्षं असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणी माहिती मिळताच मुंबई महानगर पालिकेने संबंधित इमारत सील केली असून तिचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या रुग्णावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्यक्तीने कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नसून पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकटच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या