
राज्यभरात सर्वत्र महिलांकडून वटपौर्णिमा साजरी केली जात असताना मंगळवारी प्रामुख्याने कुडाळमध्ये मात्र एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम पाहायला मिळाला. येथे वटपौर्णिमेदिवशी पुरुष मंडळींनी एकत्र येत आपल्या पत्नीच्या सुखी आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पुरुषांची वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारत, सुताने गुंडाळून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना या वेळी पुरुषांनी केली. कुडाळसह कोकणात महिलांनी वटपौर्णिमा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला.






























































