व्हिडीओ : शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारी दरोडेखोराची धुलाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगावकर । यवतमाळ

देशात लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक सरकारी कार्यालयातील काही सरकारी अधिकारी कामासाठी लाच स्वीकारताना पकडल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर आता या सरकारी कार्यालयांना ‘लाचगल्ली’ असे म्हटले जातेय. याला कारणीभूतही काही लाचखोर सरकारी अधिकारीच आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही असाच लाचखोरीचा एक प्रकार समोर आला आहे. प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी करणाऱ्या तलाठ्याचा गोरगरिब शेतकऱ्यांना लुटतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. कळंब तहसील कार्यालयातील या सरकारी बाबूची त्यांनंतर चांगलीच धुलाई करण्यात आली. तसेच लाच घेतानाचा व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून कारवाईची मागणी केली आहे.

कळंब तहसील कार्यालयातील तलाठी आर.आय. शेख हा शेतकऱ्यांना प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी करायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा वैताग आला होता. जोडमोहा येथील काही शेतकरी फेरफाराची नोंद घेण्यासाठी तहसील कार्यालयात आली होती. परंतु तलाठी शेख याने पैसे दिले तरच कागदपत्रे देऊ असा पवित्रा घेतला होता. परंतु शेतकऱ्यांनी तलाठी शेख याचा पैसे घेतानाचा व्हिडीओ तयार करून त्याची पोलखोल केली. तसेच नायब तहसिलदारांच्या केबिनमध्ये नेऊन त्याची धुलाईही केली. या घटनेची माहिती मिळताच कळंब येथील तहसिलदार रंजीत भोसले यांनी तात्काळ कारवाई करत शेख यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे.

पाहा व्हिडीओ :