
काही जोडपी सात फेरे घेऊन तर कुणी सप्तपदी घेऊन आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन घेत असतात. पण आसाममधील एका जोडप्याने त्यांच्या लग्नात चक्क करारच केलाय. लग्नात नवरी या करारावर स्वाक्षरी करतानाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. ‘नवरीने रोज साडी घालावी.’ अन ‘घरच्या जेवणाला हो म्हणायचं’ अशा करारातील काही अटी खूपच लक्षवेधी आहेत. तसेच ‘महिन्याला एक पिझ्झा’, ‘पंधरा दिवसांनी खरेदी’ आणि ‘लेटनाईट पार्टी फक्त माझ्यासोबतच’ असंही करारात लिहिलंय. शांती आणि मिंटू या जोडप्याने लग्नाचा अनोखा करार केला आहे.
– करारात वधूवरांनी परस्परांना काय करावे, काय करू नये ते सांगितले आहे. वेडलॉक फोटोग्राफी आसाम नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.



























































