एवढे महागडे गिफ्ट बघून नववधूला हसू अनावर, वाचा काय मिळाले तिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नासारख्या खास दिवशी कायम लक्षात राहील असं कोणतं गिफ्ट वधूवरांना द्यावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. सध्या महागाई वाढली आहे. देशात पेट्रोलचे दर वाढत आहेत. त्यासोबतच सिलिंडरच्या किमती वाढत आहेत आणि कांदाही रडवत आहे. अशा स्थितीत नवदांपत्याला मिळालेल्या आणि कायम लक्षात राहणाऱया अशा एका गिफ्टची जोरदार चर्चा रंगली आहे. तामीळनाडूमध्ये काही मित्रांनी नवरदेवाच्या सुखी संसाराला हातभार लावण्यासाठी त्याला चक्क घरगुती गॅस सिलिंडर आणि पेट्रोलचा कॅन भेट दिलाय. एवढेच नव्हे तर कांदेही भेट दिले. हे खास गिफ्ट बघून नवदांपत्यच नव्हे तर नेटकरीही चांगलेच खूश झाले आहेत.

चेन्नईती लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओत पाहुण्यांच्या हातात पेट्रोलचा पॅन, गॅस सिलिंडर आणि कांदे दिसत आहेत. असं अनोखं गिफ्ट बघून वधू चक्क हसत आहे. तर देशभरामध्ये गॅसचे आणि इंधनाचे दर झपाटय़ाने वाढत असताना असलं महागडे गिफ्ट देणाऱया मित्रांचे काwतुक होत आहे. लग्नातील इतर काही पाहुण्या मंडळींनी नवदांपत्याच्या गळ्यात चक्क कांद्याच्या माळाही घातल्या आहेत. मित्रांच्या या कल्पकतेला नेटकरी चांगलीच दाद देत आहेत.