
सामना ऑनलाईन । जेनोवा
इटलीच्या लिगुरिया प्रदेशाची राजधानी जेनोवा येथे भीषण दुर्घटना घडली आहे. येथील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
#14ago #Genova 12:00, crolla parte del ponte Morandi sulla #A10. Le squadre #vigilidelfuoco stanno operando in massa, attivatinteam usar e cinofili pic.twitter.com/gjSJLvjw1K
— Vigili del Fuoco (@emergenzavvf) August 14, 2018
दरम्यान, ही दुर्घटना घडली त्यावेळी पुलावरील वाहतूक सुरू होती. दुर्घटनेमध्ये पुलावरील गाड्या 100 मीटर (328 फूट) खाली कोसळल्या आहेत. या पुलाखाली काही घरंही दिसून येत आहेत. या घरांवर पुलाचा काही भाग कोसळ्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Disastro a #Genova. Crolla il ponte Autostradale. Stiamo cercando informazioni. pic.twitter.com/f2Z0c91JLZ
— Sergio Battelli (@BattelliSergio) August 14, 2018
दरम्यान, परिवहन मंत्री डॅनिल टोनिनेली यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना ही गंभीर दुर्घटना असल्याचे म्हटले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाचा सर्वाधिक भाग रेल्वे ट्रॅकवर पडला असून हा भाग कोसळला त्यावेळी पुलावर गाड्या आणि ट्रकची ये-जा सुरू होती. पुलासह या गाड्याही खाली कोसळल्या आहेत.
दुर्घटना झालेला पूल 1960 च्या दशकात बांधण्यात आला होता. ‘मोरांडी पूल’ या नावाने तो ओळखला जात होता. मुसळधार पाऊस सुरू असताना दुपारी 10 वाजता (स्थानिक वेळ) हा पूल कोसळला.
Summery – Genoa motorway bridge collapses in Italy, 22 dead





























































