कराडमध्ये साकव पूल साठवण बंधाऱ्याचे काम पूर्ण, शेतीमाल वाहतुकीचा सुटला प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातार्‍यातील निनाम  येथील रस्त्यावरील बेंद ओढ्यावरील साकव पुलाचे काम पूर्ण झाले आहे. सदर ठिकाणाहून शेतीमाल ने – आण करण्यासाठी यापूर्वी कोणतीही व्यवस्था नव्हती त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ यांना मोठी गैरसोय होत होती. याठिकाणी 4.25 मीटर रुंदीचा व 6 मीटर लांबीचा एका गाळ्याचा  उंच पूल बांधल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे.

या कामासाठी  35 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. तसेच येथील गरुड ओढ्यावरील साठवण बंधाऱ्याचेही काम पूर्ण झालेले आहे. या कामामुळे शेती सिंचनासाठीची मोठी सोय झाली आहे. या कामासाठी रक्कम रुपये 15 लाख निधी खर्चित झाला आहे. या दोन्ही कामांमुळे शेतकरी शेतकऱ्यांची मोठी सोय झाली असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.