
नेदरलँडमध्ये पिवळ्या रंगाचा दुर्मीळ कॅटफिश आढळून आला आहे. मार्टिन ग्लेट्ज याने भाऊ ओलिव्हर याच्यासोबत हा मासा पकडला आहे.

ग्लेट्ज बंधूंनी पकडलेला मासा हा वेल्स क२टफिश आहे. शास्त्रीय भाषेमध्ये याला सिलूरस ग्लॅनिस (Silurus Glanis) असे म्हटले जाते. यूरोपमधील नदी आणि सरोवरांमध्ये माशाची ही प्रजाती आढळते. याची लांबी 9 फुटांपर्यंत, तर वजन 130 किलोपर्यंत वाढू शकते.

आता तुम्ही म्हणाल यूरोपच्या नदी आणि सरोवरांमध्ये आढळणारा हा मासा दुर्मीळ कसा? तर यालाही कारण आहे. मार्टिन ग्लेट्ज याने पकडलेल्या कॅटफिशला ल्यूसिस्म नावाचा एक आजार आहे आणि यामुळे या माशाचा रंग पिवळा झाला आहे.

साधारणपणे कॅटफिश नेहमी गडद हिरव्या रंगात आढळते. या माशांना अनुवांशीकतेमुळे कमी दिसते, मात्र ग्लेट्जने पकडलेली कॅटफिश सरोवरामध्ये आरामात फिरत होती.
Extremely rare, bright-yellow catfish caught in the Netherlands https://t.co/IOvFsb0D9w
— Live Science (@LiveScience) October 20, 2021



























































