हिंदुस्थानी संशोधकांना यश ब्रिटिश कोरोनालाच ‘आयसोलेट’ केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनला आयसोलेट (वेगळे करण्यात) करण्यात हिंदुस्थानी संशोधकांना यश आले आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली असताना नव्या व्हायरसच्या स्ट्रेन्सला आयसोलेट करणारा हिंदुस्थान हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.

इंडियन कौन्सिल आँफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सोशल मीडियावर ब्रिटनमधील नव्या व्हायरसच्या स्ट्रेनविषयी माहिती दिली. कोरोनाच्या ब्रिटन म्यूटेंटला आयसोलेट केल्याचे आयसीएमआरने सांगितले. यामुळे म्युटेंटवर लसीचा कितपत परिणाम होऊ शकणार आहे, याचे संशोधन करता येणार असून व्हायरसवरील उपचार शोधण्यातही मदत होणार असल्याचेही आयसीएमआरने स्पष्ट केले. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच देशभरातील प्रयोगशाळांमध्ये कोरोना व्हायरसला ट्रँक करण्यात येत आहे.